मुंबई : काल(६ मार्च) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. तसेच यावेळी फडणवीसांच्या गाडीच्या दिशेने एका अज्ञाताने चप्पल भिरकावली. दरम्यान, या घटनेनंतर आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘आपण ४ वेळा मुख्यमंत्री झालो हे अर्ध सत्य सांगून एकदाही कार्यकाळ पूर्ण करू शकलो नाही हे न सांगणारे शरद पवार यांची ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीची कमाई चप्पल भिरकावणारे भेकड हीच आहे’, असे भातखळकर म्हणाले आहेत.
आपण ४ वेळा मुख्यमंत्री झालो हे अर्ध सत्य सांगून एकदाही कार्यकाळ पूर्ण करू शकलो नाही हे न सांगणारे शरद पवार यांची ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीची कमाई चप्पल भिरकावणारे भेकड हीच आहे. pic.twitter.com/0NQfLjSrEG
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 7, 2022
दरम्यान, देवेंद्र फडणवीस अटल बिहारी वाजपेयी उद्यानात प्रवेश करत असतांना ही धक्कादायक घटना घडली. तद्पश्चात यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की,‘हे लोक कोण होते मला माहित नाही, फालतू, चिल्लर लोक असतील.’ तसेच काही चांगले काम करून श्रेय घ्या, पण कामं करायची नाहीत अन दुसऱ्यांसमोर निदर्शन करायची. देव त्यांना सुदबुद्धी देवो. अण्णा साहेब पाटलांच्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नावाच्या उद्यान समोर आंदोलन करण्याची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडली. मला यांच्या बुद्धीची कीव येते, असेही फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- कर्णधार रोहित शर्माचे जडेजाबद्दल मोठे वक्तव्य, म्हणाला मी त्याला…
- बस ड्रायव्हरच्या अवतारानंतर आता नवी वेश घेत माही म्हणाला “अब बहानेबाजी नॉर्मल है”
- नारायण राणे ‘आधीश’ बंगल्यामुळे अडचणीत; BMC ने पाठवली कारणे दाखवा नोटीस
- “शरद पवारांचा पत्ता कधी कापला गेला हे त्यांना…”, भातखळकरांचे टीकास्त्र
- हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत चालणार ‘या’ दिवशी- नितीन गडकरी


