पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरीतील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा पुणे मेट्रो प्रवास केला आहे. त्यांनी अचानक कुणालाही न सांगता मेट्रो स्टेशनवर हजेरी लावल्याने सर्वच अश्चर्यचकित झाले. दरम्यान शरद पवार मेट्रोची पाहणी करण्यासाठी येणार याची माहिती शेवटपर्यंत कुणालाच दिली नव्हती. स्थानिक पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी ही माहिती देण्यात आली. शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली.
सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शरद पवार हे फुगेवाडी येथे दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती जाणून घेतली. तसेच विविध सुचनाही यावेळी केल्या.
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/903790243671015
पिंपरीतील मेट्रोचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. आज शरद पवार यांनी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास फुगेवाडी येथील मेट्रो स्थानकाला भेट देऊन फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवास केला. दरम्यान, मेट्रोला भेट देणार असल्याची माहिती त्यांनी कोणालाच दिली नव्हती. ऐनवेळी शरद पवार येणार आहेत अशी माहिती स्थानिक आमदार आणि शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना देण्यात आली. शरद पवार यांनी दीड तास थांबून मेट्रो विषयी सर्व माहिती घेतली असे वाघेरे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या
“भाजप राजकीय फायद्यासाठी जातीय चौकटीत बांधू पाहतेय”, संजय राऊतांची टीका
“भाजप पुढाऱ्यांना दलितांच्या घरी जेवल्याचा बोभाटा करावा लागतो, याचाच अर्थ त्यांच्या मनात ‘जात’ आहे”
जितेंद्र आव्हाडांनी घेतली किरण मानेंची बाजू म्हणाले, “वागणुकीमुळे नाही तर…”
‘ही शिवसेना नव्हे, ही तर काँग्रेस सेना’; रवी राणांचा शिवसेनेवर हल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी परवानगी कशाला हवी? नवनीत राणांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

