🕒 1 min read
नवी-दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी बोलत असतांना देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू(Venkaiah Naidu) यांनी भारत हा जगातला सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश असल्याचे ठामपणे सांगितले आहे. तसेच पाश्चात्य माध्यमांकडून भारताची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने रंगवली जात असल्याची टीका देखील नायडू केली.
यावेळी बोलत असतांना नायडू म्हणाले की,’सध्या हा ट्रेंड दिसतोयय. विशेषत: पाश्चात्य माध्यमांमध्ये हा ट्रेंड दिसतोय. भारताची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यांना हे सहन होत नाही की भारत प्रगती करतोय, भारताला जागतिक स्तरावर विश्वगुरू म्हणून सन्मान मिळतोय. त्यामुळे भारताची प्रतिमा नकारात्मक पद्धतीने मांडली जाते. त्यांना इंडायजेशनचा त्रास होत असावा.’
…There are instances of individuals here and there… but as a whole, we practice secularism because it's in the blood, nerves & veins of Indians not because of this govt or that govt…Respecting all religions is our age-old practice: Vice President Venkaiah Naidu in Delhi pic.twitter.com/ZEWwixfvRu
— ANI (@ANI) November 26, 2021
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वृत्तपत्रांचं स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता या मुद्द्यांवरून ते भारतावर टीका करत आहेत. पण माझ्या अभ्यासानुसार भारत हा जगभरात सर्वाधिक धर्मनिरपेक्ष देश आहे. असा दुसरा कोणताही देश नाही. इथे जात, धर्म, लिंग, प्रदेश यावरून भेदभाव होत नाही. त्या सगळ्यांचा सन्मान होतो. काही अपवादात्मक घटना आहेत. पण एक देश म्हणून आपण धर्मनिरपेक्ष आहोत. कारण भारतात धर्मनिरपेक्षता ही भारतीयांच्या रक्तात, नसानसांत आहे. ही फक्त एखाद्या सरकारमुळे नाही. ती भारतीय जनतेमुळे आहे’, असेही नायडू यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव- यशोमती ठाकूर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

