मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काल (६ मार्च) विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले असता त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकावण्यात आली. तसेच घोषणाबाजीही करण्यात आली. यावर भाजपकडून अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.
“विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही.”, असे ट्वीट करत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांच्या गाडीवर चप्पल भिरकवल्याचं समजतंय. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या व्यक्त करण्याचे अनेक संवैधानिक मार्ग आहेत. पण त्याऐवजी चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 7, 2022
दरम्यान या घटनेवरूनच भाजपने आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीवर निशाणा साधला. तर भाजप-राष्ट्रवादीचे नेतेही आमने-सामने आले. यावरच आता भाजप नेते नितेश राणे यांनी राष्ट्रवादीला थेट आव्हानच दिले आहे. “राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एवढी हिंमत दाखवत असतील तर त्यांचे नेते राज्यात कसे फिरतात हे आम्ही पाहू. जागोजागी त्यांना चपलांचा हार घालण्याचा कार्यक्रमात आम्ही हातात घेऊ. मग चपला मोजण्याचं काम त्यांनी करावं.”, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
साहाला धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव उघड ; क्रिकेट जगतात नवीन वादळाला सुरुवात
“शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीची कमाई चप्पल भिरकावणारे…”, अतुल भातखळकरांचा हल्लाबोल
“…या पुढे तुमची उडी कधी गेलीच नाही रोहितजी”, अतुल भातखळकरांचा टोला
“…पण तुम्हाला आजपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही”, पडळकरांचा खोचक टोला


