🕒 1 min read
यवतमाळ : माजी आमदार अनंतराव देवरसकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत असतांना अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बाल कल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर(Yashomati Thakur) काही लोक अमरावती शहरात आतंक करत होते. त्यावेळी काही मुस्लीम लोकं मंदिराचं रक्षण करत होते. तर, काही हिंदू लोकं मशिदीचं रक्षण करत होते. हाच माझा देश आहे. माझा धर्म आणि माझी जात हा तिरंगाच आहे,असे म्हणाल्या. तसेच महाराष्ट्र पेटवण्याचं षडयंत्र होतं. महाराष्ट्राची सत्ता हातात घेण्यासाठी राज्य पेटवायचा डाव होता, असा अप्रत्यक्ष आरोपही यावेळी ठाकूर यांनी केला.
यावेळी बोलत असतांना ठाकूर म्हणाल्या की,’जय श्रीराम म्हटलं की संपला का सगळं, संपला का संविधान? असा सवाल यशोमती ठाकूर यांनी केला. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा करतोय. देशात जातीय दंगली घडवल्या जातात. दोन्ही कट्टरपंथी हे चांगले मित्र असतात आणि आपल्याला येडं बनवतात. आपल्या देशात तिरस्काराची भावना वाढवण्याचं काम सुरु आहे.’
दरम्यान, पुढे त्या म्हणाल्या की,’राज्यात आणि देशात हिंसा वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. आपण संविधान दिवस साजरा करतोय आणि दुसरीकडे रामच आपला धर्म असल्याचे बोललं जात आहे. मात्र तिरंगा हाच आपला धर्म असला पाहिजे. संविधान दिवस आहे एकोप्याचा दिवस आहे. आजच्या दिवशी मी बोलली नाही तर कुठंतरी चुकल्या सारखं होईल, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या. मी जय श्रीराम म्हणाले नाही, राम रहीम म्हटलं नाही. मी संविधान साजरा केला त्यासाठी वेळ झाला. अमरावती १२ तारखेला मोर्चा झाला, नको त्या घटना घडल्या. त्यानंतर मी फेसबुक लाईव्ह केले. त्याच्या खालच्या कमेंट वाचल्या आणि आपल्या देशात काय चाललंय असा प्रश्न पडल्याचे ठाकूर यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- प्रभू वैद्यनाथ मंदिराची एक विट सुद्धा इकडची तिकडे होणार नाही- धनंजय मुंडे
- अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?- संजय राऊत
- ‘…याला उशिरा सुचलेले शहाणपण म्हणतात’, भाजपवर राऊतांची टोलेबाजी
- कपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
