🕒 1 min read
बाली : इंडोनेशिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (Indonesia Open Badminton )भारताची दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू,(P. V. sindhu) अनुभवी बी. साईप्रणीत (b. Saipraneet)आणि सात्त्विकसाइराज रंकीरेड्डी(sattviksairaj Rankireddy)-चिराग शेट्टी(Chirag Shetty) यांनी आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र बी. साईप्रणीतला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.
महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व लढतीत सिंधूला विजयासाठी एक तास आणि सहा मिनिटे संघर्ष करावा लागला. पहिला गेम गमावूनही सिंधूने दक्षिण कोरियाच्या सिम यू जी हिच्यावर १४-२१, २१-१९, २१-१४ अशी मात केली. शनिवारी उपांत्य आज सिंधूसमोर थायलंडच्या दुसऱ्या मानांकित रॅटचॅनोक इन्टानॉनचे कडवे आव्हान असणार आहे.
तर पुरुष दुहेरीत उपांत्य फेरीत सात्त्विक-चिरागची इंडोनेशियाची अग्रमानांकित जोडी केव्हिन सुकामुल्जो आणि मार्कस जिडीऑन यांच्याशी गाठ पडणार आहे. दरम्यान पुरुष एकेरीत साईप्रणीतला डेन्मार्कच्या ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या व्हिक्टरअॅक्सेलसनने १२-२१, ८-२१ असे पराभूत केले. त्यामुळे साईप्रणीतच्या पराभवासह भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले.
महत्वाच्या बातम्या:
- मलिकांच्या घराभोवती संशयास्पद लोकांचा वावर? फोटो ट्वीट करत म्हणाले,’या गाडीत बसलेले…’
- ‘त्यांच्या’ एका फोनमुळे मला माघार घ्यावी लागली; अमल महाडिकांची खंत
- औरंगाबादेत एसटी संपकरी ठाम; रुजु होण्यासाठी महामंडळाकडून ‘अल्टिमेटम’!
- नारायण राणेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अनिल परबांचे सडेतोड उत्तर
- कपिल देव यांनी साधला हार्दिकवर निशाणा; म्हणाले…


