Share

“खरी समस्या भोंगे नाही, ‘त्यांना’ संपवण्याची हीच ती वेळ” ; नितेश राणेंचं ट्विट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर राज्यात विविध ठिकाणी राजकीय वातावरण तापले आहे. आज भोंगे न लावता अनेक मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले. मात्र काही मशिदींमध्ये भोंग्यांचा आवाज सुरूच होते, मनसे कार्यकर्त्यांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा लावल्याच्या घटना दिसून आल्या आहेत. आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भोंगे ही खरी समस्या नाही असे, म्हंटले आहे. रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घालायला हवी, तरच शांतता निर्माण होतील, असे नितेश राणे ट्विट करत म्हणाले.

राणे यांनी ट्विट केले आहे. रझा अकादमी आणि पीएफआय या दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. अशा वृत्तींना संपवण्याची हीच वेळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. ‘भोंगे ही खरी समस्या नाही. रझा अकादमी आणि पीएफआय या विष पसरवणाऱ्या दहशतवादी संघटना खरी समस्या आहे, असे राणे यांनी म्हटलं आहे.

रझा अकादमी ही एक दहशतवादी संघटना आहे. धर्मादाय आयुक्तांकडे या संघटनेची कसलीही नोंद नाही. त्यांचा नोंदणी क्रमांक नाही. तरी राज्य सरकार या संघटनेला आंदोलन करण्यास आणि सुरू ठेवण्यासाठी परवानगी देत आहे. त्यांना कोण निधी देतं हे कसं कळणार? या संघटनांची सर्व कामे थांबवायला हवीत, अशी मागणीही राणे यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!