मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवास्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असे आव्हान देणाऱ्या नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याला आज अखेर न्यायालयाकडून जमीन मिळाला आहे. राणा दाम्पत्याला ११ दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. काही अटी आणि शर्थीसह जमीन मंजूर झाला आहे. न्यायालयाकडू राणा दाम्पत्यावर लादून दिलेल्या अटी आणि शर्थी उल्लंघन झाल्यास, त्यांचा मंजूर झालेला जामीन रद्द होऊ शकतो.
या प्रकरणासंबंधीत राणा दाम्पत्याने प्रसारमाध्यमांशी बोलू नये, असे न्यायालयाकडून बंधन घालण्यात आलेले आहे. या सोबतच राणा दाम्पत्य उपलब्ध पुराव्यासोबत छेडछाड करणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. ज्या गुन्ह्यासाठी राणा दाम्पत्याला अटक झाली, असे प्रकार त्यांचाकडून पुन्हा घडणार नाही, असेही त्यांना सांगण्यात आले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्यांनी केली होती. या पाश्वर्भूमीवर युवा सेनेने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. यानंतर पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले होते. राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी अटक केली. राणा दामात्यावर १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

