Share

संदीप देशपांडेंना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात महिला पोलीस कर्मचारी रस्त्यावर कोसळली!

Published On: 

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी करत आक्रमक झाले होते. या पाश्वर्भूमीवरून आज राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांना पोलीस ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला पोलीस कर्मचारी रसत्यावर कोसळल्याची घटना घडली.

मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे. त्यानंतर आज संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला पण हा प्रयत्न फसला. संदीप देशपांडे हे घटनास्थळावरून निघून जात असताना त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात गाडीचा धक्का लागल्याने महिला पोलीस कर्मचारी खाली पडली. त्यानंतर इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना आधार देत उभा केले.

नेमेके राज ठाकरे काय म्हणाले –

राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथील सभेत भाषण सुरु असताना, मध्येच अजान वाजलं होत. यावर संतापून राज ठाकरे म्हणाले, “जर हे सभेच्य वेळेला भांग देणार असतील, भांग सुरु करणार असतील तर आपण आताच्या आता ताबडतोब तोंडात बोळा कोंबावा. जर यांना सहज आणि सरळ मार्गाने समजत नसेल तर मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात काय होईल, मला माहिती नाही. पोलिसांनी आताच्या आता जाऊन हे बंद करा. त्यांना जर सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा काय ते होऊनच जाऊ देत. अजिबात शांत बसता कामा नये तुम्ही, हे जर या पद्धतीने वागणार असतील, यांना सरळ सांगून जर समजात नसेल, महाराष्ट्राचं मनगटात काय टाकत आहे हे यांना दाखवावंच लागेल. माझी पोलिसांना विनंती आहे की, या लोकांची थोबाडं बंद करा. माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की, मागचा पुढचा विचार करू नका. हे भोंगे उतरवले गेले पाहिजेच. अभी नही तो कभी नही.”

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!