Share

“…तर बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट त्यांच्याकडे पाठवू”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ व्हिडिओ ट्वीटवर राऊतांचे प्रत्युत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीसमोरील भोंग्याबाबत ३ मेचा अल्टीमेटम दिला होता. अन्यथा ४ तारखेपासून  हनुमान चालीसा वाजवण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते. दरम्यान आज पहाटे नागपूर आणि ग्रामीण भागात तसेच राज्यातील अनेक भागात मशिदींमध्ये आवाजाची मर्यादा पाळण्यात आल्याचे दिसून आले. तत्पूर्वी राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) मशिदीवरील भोंग्याबाबत भूमिका मांडताना दिसून येत आहेत. यावरच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.

“बाळासाहेबांचे प्राचीन व्हिडीओ जरी टाकले, तरी आम्हाला त्यांच्याविषयी कुणी सांगण्याची गरज नाही. त्यांनीच एकदा  बाळासाहेब तपासले पाहिजे. शिवसेना प्रमुखांच्या भूमिकांचा, विचारांचा इतिहास आमच्यासारख्यांना कुणी सांगण्याइतकं आम्ही अजून खाली घसरलेलो नाही. आजही आमचा श्वास बाळासाहेबांच्या विचारांनीच चालतो.”, असे संजय राऊत म्हणाले आहेत. ते आज माध्यमांशी संवाद साधत होते.

तसेच बाळासाहेबांनी भोंग्याबाबतीत भूमिका मांडली होती. पण त्यांनी रस्त्यावरचे नमाज तोडगा देऊन बंद केले. हा इतिहास कुणाला माहिती नसेल, तर त्यांनी पुन्हा बाळासाहेब समजून घ्यावे. यासंदर्भातल्या बाळासाहेब यांच्या भाषणाच्या कॅसेट आम्ही त्यांच्याकडे पाठवून देऊ. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

दरम्यान राज ठाकरेंनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये “ज्यादिवशी आमचे सरकार महाराष्ट्रात येईल, त्यादिवशी आम्ही रस्त्यावरील नमाज पढणे बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो, जो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. हिंदू धर्माचा कुठे उपद्रव होत असेल त्यांनी आम्हाला येऊन सांगावे, आम्ही बंदोबस्त करूत. माशिदिवरील लाऊडस्पीकर खाली येतील.”, असे बाळासाहेब ठाकरे म्हणतात दिसून येत आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!