Share

‘सरासरी पाऊस पण पिकांना भाव नाही’; भेंडवळची भविष्यवाणी

Published On: 

बुलढाणा:  राज्यभरातील शेतकऱ्यांसह बियाणे कंपन्यांचे लक्ष लागून असलेल्या भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित अखेर आज बुधवारी जाहीर करीत, 350 वर्षांहून अधिक अशा भेंडवळच्या भविष्यवाणीची परंपरा अखंडित ठेवली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळच्या या भविष्यवाणीकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं होतं. भेंडवळ घटमांडणीनुसार यंदा जून आणि जुलै महिन्यात पाऊस साधारण प्रमाणात पडेल. तर ऑगस्ट महिन्यात चांगला आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस जास्त असेल असं भाकित वर्तवण्यात आलं आहे.

देशात आर्थिक टंचाई भासणार असल्याचं सांगितलं आहे. सर्वत्र प्रसिद्ध असणाऱ्या भेंडवळच्या घट मांडणीचे निष्कर्ष आज सकाळी जाहीर झाले आहेत. या भेंडवळच्या भाकिताकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असतं. भेंडवळच्या या घट मांडणीच्या निष्कर्षाला 350 वर्षांची परंपरा आहे. ही घट मांडणी ऐकण्यासाठी दरवर्षी गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, मराठवाडा, खान्देश या ठिकाणाहून विविध शेतकरी येतात. अक्षय्य तृतीये च्या दुसऱ्या दिवशी हे भाकित सांगितलं जातं. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती, जी त्यांचे वंशज आजही पुढे चालवत आहेत.

सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकित व्यक्त केलं आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. या भविष्यवाणीवर शेतकऱ्यांचा खूप विश्वास आहे. जून आणि जुले महिन्यात साधारण पाऊस पडेल ऑगस्ट महिन्यात चांगला तर सप्टेंबर महिन्यात जास्त होईल. विशेष म्हणजे अवकाळी पाऊस ही राहणार आहे.

वार्षिक पीक परिस्थितीचे भाकीत –

तूर पीक – या वर्षात तूर हे सर्वात चांगले येणारे पीक असेल तर कपाशीचे पीक हे कमी जास्त अधिक सर्वसाधारण राहील. अतिवृष्टी आणि जास्त पावसामुळे ज्वारीचे पीक साधारण असून या पिकांची नासधूस होण्याची शक्यता वर्तविली जास्त आहे.

मुग – मुगाचे पीक सुद्धा साधारण असून उडदाचे पीक साधारण राहील आणि या पिकाची सुद्धा नासाडी वर्तवण्यात आली आहे.

तीळाला तेजी – तीळ हे तेलवा नसून तेलवर्गीय पीक असून त्याचे भाव साधारण राहतील भादली हे पिक रोगराईचे प्रतीक आहे. ह्या वर्षात रोगराईचे प्रमाण अधिक असल्याचे भाकीत करण्यात आले आहे.

तांदूळ, ज्वारी, बाजरी, हरभरा साधारण बाजरीचे पीक चांगले राहील. मटकी पण साधारण राहील. तांदळाचे पिक चांगले असेल. वाटाणा सर्वसाधारण नसेल. गहू हरभऱ्याचे पीक ह्या वर्षात चांगले राहणार आहे तसेच करडीचे पीक सुद्धा चांगले राहणार आहेत. यावर्षीही रोगराई कमी असणार – कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!