वाशिम : राज्यातील तीन पक्षांचं महाविकासआघाडी सरकार येत्या जून महिन्यात कोसळणार असे, भाकीत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. राणे हे वाशीम येते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्य शासनाचे पैसे येत नाही. राज्यशासन राजकारण जास्त आणि विकास कमी करतं. अशी टीका ही नारायण राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आत्मनिर्भर व्हावा, यासाठी ३० योजना आणल्या. त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहायला वाशीम येथे आलो आहे, असे नारायण राणे म्हणाले.
जीडीपीचा पन्नास टक्के वाटा माझ्या खात्याचा आहे. सर्वांगीण विकासासाठी अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे. योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार आहे. असेही राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

