मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा आता मध्यावर आली आहे. क्रिकेटच्या या नामवंत स्पर्धेतून आपल्याला अनेक गुणवान खेळाडू मिळाले आहे. यापैकी एक नाव मुंबई इंडियन्स संघाचा (MI) फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे आहे. सूर्यकुमार हा भारतीय संघातूनही खेळतो आणि तो या संघाचा आता अविभाज्य भाग आहे. त्याला स्काय (SKY) नावाने ओळखले जाते. आता त्याने हे नाव कसे पडले, याचा खुलासा केला.
हे टोपणनाव सूर्यकुमार यादवला २०१४ मध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघात मिळाले होते आणि त्या वेळी संघाचा कर्णधार गौतम गंभीर होता. गंभीरने केकेआर संघात भरपूर संधी देत त्याला आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी दिली. तिथून सूर्यकुमारची कहाणी बदलली आणि पुढे जाऊन त्याला या लीगमध्ये अधिक यश मिळाले.
गौरव कपूरच्या यूट्यूब शो ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’मध्ये सूर्यकुमार यादवने खुलासा केला, गंभीरने त्याचे नाव ‘SKY’ ठेवले होते. तो म्हणाला, ”२०१४ मध्ये जेव्हा मी केकेआर संघात होतो तेव्हा गौती भाईंनी मला मागून दोन-तीन वेळा ‘SKY’ हाक मारली होती. मी लक्ष दिले नाही. मग तो म्हणाला, मी तुलाच बोलावतोय. तेव्हा मला समजले की होय ते ‘स्काय’ आहे.”
सूर्यकुमार यादव हा मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि त्यामुळेच त्याच्यावर महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा साहजिकच प्रभाव आहे. त्याने तेंडुलकरसोबतचा एक किस्सा शेअर केला. तो म्हणाला, ”मी पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये गेलो तेव्हा बसायला जागा नव्हती. मी माझी किट बॅग घेऊन उभा राहिलो. तेंडुलकर गणेशमूर्तीजवळ बसायचे. त्याने मला त्याच्या शेजारी बसायला सांगितले आणि तेव्हापासून मी तिथेच बसलो. जर देवाने तुम्हाला त्याच्या शेजारी बसण्यास सांगितले असेल तर नेहमी तसे करावे.”
मुंबई इंडिय़न्सचा यंदाचा हंगाम अतिशय वाईट ठरला आहे. त्यांना आतापर्यंत एकही विजय मिळालेला नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या मुंबईला सलग सहा पराभव पत्करावे लागले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

