मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स (RR vs KKR) यांच्यातील सामना खूपच रोमांचकरित्या पार पडला. या सामन्यात चाहत्यांना चौकार आणि षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली, त्यानंतर गोलंदाजांनीही आपली कला दाखवली. या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांनी जोरदार फटके खेळले आणि त्यानंतर गोलंदाजीत युझवेंद्र चहलने संघाचा विजय निश्चित केला. या सामन्यानंतर युझवेंद्र चहलसह रवीचंद्रन अश्विन याची (Ravichandran Ashwin) गोलंदाजीही खूप चर्चेत ठरली. या सामन्यात अश्विनने फक्त एक विकेट घेतली, पण ही विकेट या सामन्यातील सर्वात स्फोटक फलंदाजाची होती, ज्याला अश्विनने पहिल्याच चेंडूवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
अश्विनने कोलकाताविरुद्ध ४ षटके टाकली, ज्यामध्ये त्याने ९.५च्या इकॉनॉमीने ३८ धावा दिल्या आणि १ बळी घेतला. या सामन्यात अश्विनने केकेआरचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलला बाद केले. अश्विनने सुरेख कॅरम चेंडूवर रसेलची दांडी गुल केली. या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या सामन्यात अश्विनसमोर रसेल अजिबात टिकू शकला नाही आणि पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. केकेआरच्या डावातील १४व्या षटकातील चौथ्या चेंडूवर अश्विनने रसेलविरुद्ध आपली चाल खेळली आणि कॅरम चेंडूवर त्याला माघारी पाठवले.
https://twitter.com/rishobpuant/status/1516106575110238212?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1516106575110238212%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fipl%2Frajasthan-royals-bowler-ravichandran-ashwin-clean-bowled-andre-russell-vs-kkr-ipl-2022%2F1157795
अश्विन हा आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्सचा एक महत्त्वाचा खेळा़डू आहे, त्याला संघाने मेगा लिलावात ५ कोटी रुपयांना विकत घेतले. राजस्थान संघ या हंगामात त्याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत आहे. अश्विनने या मोसमात आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ७.५४च्या इकॉनॉमीने २ बळी घेतले आहेत. अश्विनने या मोसमातही फलंदाजीत ३९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

