Share

“आधी भाजपशासित राज्यांमधील मशिदींवरील भोंगे उतरवा”; प्रवीण तोगडियांचे राज ठाकरेंना आवाहन

Published On: 

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाती घेतलेल्या भोंग्यांच्या मुद्द्यामुळे राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता हा मुद्दा राष्ट्रीय पातळीवरही चर्चेचा विषय बनत आहे. आता आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी भोंग्यांचा मुद्द्यावर राज ठाकरे आणि भाजप वर निशाना साधला आहे. “भोंग्यांवरून सध्या महाराष्ट्रातील वातावरण तापलेले आहे. राज्यातील भाजपचे त्याला समर्थन आहे. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे; पण भोंगे प्रकरणावर दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा आधी भाजपचे सरकार असलेल्या राज्यांमधील मशिदीवरील भोंगे उतरवा आहे.” असे प्रवीण तोगडिया म्हणाले.

प्रवीण तोगडिया पुढे म्हणाले, “महाराष्ट्रात भाजप सरकार असतानाही मशिदीवरील भोंगे होतेच; परंतु तेव्हा ते काढण्यात आले नाहीत. रात्री दहा ते सूर्योदयापर्यंत भोंगे वाजवण्यात येऊ नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. त्‍यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांमधील जिल्हाधिकारी तसेच पोलिसांना तसे आदेश द्यावे. उत्तर प्रदेशातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावे, अशी मागणी आम्ही १० वर्षांपूर्वीच केली होती.”

मोहन भागवत यांनी नुकतेच अखंड भारताच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. येत्या १५ ते २० वर्षात अखंड भारत निर्माण होऊ शकतो, असे मोहन भागवत म्हणाले होते. प्रवीण तोगडिया यांनी मोहन भागवत या वक्तव्यावर ही खोचक प्रतिक्रीया दिली आहे. “मोहन भागवत यांनी स्वत: रणगाड्यावर बसून पाकिस्तानवर हल्ला करावा,” असा खोचक टोला प्रवीण तोगडिया यांनी लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!