Share

“पण शरद पवार हे जातीयवादी…”; राजू शेट्टींची प्रतिक्रिया

Published On: 

उस्मानाबाद :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्या साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, साखर कारखानदारी धोरण आणि निर्णय यावर माझा पवारांवर आक्षेप आहे पण शरद पवार हे जातीयवादी किंवा धर्मवादी नाहीत.

काल शरद पवार यांनी ऊस हे आळशी लोकांचे पिक आहे, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर राजू शेट्टी यांनी उत्तर दिलं आहे. तसेच उस हे आळशी लोकांचे पिक आहे, हे शरद पवार कसे म्हणाले? असा सवाल देखील राज शेट्टी यांनी उपस्थितीत केला आहे. आजपर्यंत शेतीचे सर्वात जास्त ज्ञान पवार साहेबांना आहे, असं वाटत होतं. पण ते आता कुठेतरी मला चुकीचं वाटत आहे. एकमेव उस पिक आहे ज्याला बंधनकारक हमीभाव आहे. तशाच प्रकारचा हमीभाव इतर पिकांना मिळाला असता तर निश्चितच शेतकरी त्याकडे वळाला असता.

“प्रत्येकजण आपला धर्म पाळतो. ही भारतीय प्रवृत्ती आहे. प्रदर्शन करायची गरज नाही प्रत्येक घरात देवघर आहे तिथे तासंतास पूजा करावी पण त्याचे प्रदर्शन करण्याची किंवा जबरदस्ती करण्याची गरज नाही. जाती धर्मांच्या बाहेर जावून जे सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडतील त्याला समर्थन आहे. वीज, पेट्रोल, गॅस, महागाई याकडे लक्ष द्या यावर चर्चा हवी” अशीही प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. तसेच राजकीय दुरावा होत असतो. मात्र जनतेचे प्रश्न बाजूला पडत आहेत. सत्ताधारी वर विरोधक हे दोन्ही अपयशी असून तुम्ही आमचे काढू नका आम्ही तुमचे नाही, असे संगमताने सुरु असल्याचे देखील सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!