Share

‘ते’ पुस्तक लिहिणाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही; संभाजीराजे आक्रमक

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : पत्रकार गिरिश कुबेर यांच्या ‘Renaissance State: The Unwritten Story of the Making of Maharashtra’ या पुस्तकामधील छत्रपती संभाजी महाराज आणि मातोश्री सोयराबाई राणीसाहेब यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह लिखाणावरून राज्यातील वातावरण तापले आहे. या पुस्तकात आक्षेपार्ह मजकूर छापून कुबेर यांना नेमकं काय साध्य करायचं आहे? असा सवाल आता अनेक जण उपस्थित करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आल्याचा आरोप देखील काही संघटनांनी केला आहे. त्यामुळे कुबेरांनी महाराष्ट्राची माफी मागवी आणि राज्य सरकारने तातडीने या पुस्तकावर बंदी घालावी, अशी मागणी अनेक संघटनांनी केली आहे.

आता भाजप खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील गिरीश कुबेर यांचा निषेध केला असून “रीनैसंस द स्टेट” या पुस्तकावर महाराष्ट्रासह देशभरात कायमची बंदी घालावी अशी मागणी केली आहे. संभाजीराजे हे मराठा आरक्षणाबाबत समाज बांधवांचे असलेलं मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र दौरा करत आहेत. यावेळी नांदेडमध्ये पोहोचल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सदर पुस्तकाबाबत भाष्य केलं आहे.

असे लिखाण आपण खपवून कसे घेतो? सरकारने आजपर्यंत पुस्तकावर बंदी का आणली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पुस्तक लिहिणाऱ्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही, असा आक्रमक इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे. यामुळे या पुस्तकाला सर्वच स्तरातून विरोध केला जात असून महाराष्ट्र सरकार कठोर पाऊल उचलणार का ? हे महत्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!