Share

सत्ताधारी आणि विरोधक मार्ग काढण्याऐवजी टिका करण्यात व्यस्त; संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत !

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा नेत्यांनी बैठका घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जात असल्याचं सांगितलंय. तर, दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भूमिकेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील रंगले आहेत.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोरोना काळातील गांभीर्य ओळखून संयम बाळगण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, यानंतर चाललेल्या आरोप-प्रत्यारोपानंतर संभाजीराजे हे देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणं हीच भूमिका असून आता महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये जाऊन मराठा समाजाच्या भावना समजून घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची काल सुरुवात झाली. आज नांदेडमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून आपल्याभुमिकेबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीसह विरोधक भाजप व इतर नेत्यांवर देखील निशाणा साधला आहे. ‘सत्ताधारी आणि विरोधक हे मराठा आरक्षणासाठी मार्ग काढण्याऐवजी एकमेकांवर टीका करण्यात व्यस्त आहेत. सर्वोच्च न्यायालयात अनेक्झरचे इंग्रजी रूपांतर करण्यासाठी एकदा नाही, तर दहादा अशोक चव्हाणांना सांगितले. पण तसं झालं नाही,’ अशी खंत संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!