मुंबई : पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने गोवा, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांना मोठा तडाखा दिला.महाराष्ट्रातील कोकणाला या तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी विविध प्रकारचे नुकसान झाले आहे. राज्य सरकार नुकसानग्रस्त भागाला काय मदत जाहीर करणार याकडे सर्वाचं लक्ष लागले होते. अखेर नुकसानग्रस्त भागात निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
‘तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. 21 मे रोजी त्यांनी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता. कुणालाही वंचित ठेवणार नाही आणि व्यवस्थित मदत केली जाईल असे आश्वस्त केल्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.’ ट्विटर हँडल सीएमओ वरून ही घोषणा करण्यात आली आहे.
तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसानभरपाई देणार अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. २१ मे रोजी त्यांनी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता. कुणालाही वंचित ठेवणार नाही आणि व्यवस्थित मदत केली जाईल असे आश्वस्त केल्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 25, 2021
गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून नुकसान झाले होते. त्यानंतर 21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला होता आणि तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल व कुणालाही वंचित ठेवणार नाही, असे आश्वस्त केले होते. त्याप्रमाणे नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वयाच्या तेविसाव्या वर्षापर्यंत अनाथालयात राहता येणार, शहरातील बालकाश्रमांकडून निर्णयाचे स्वागत!
- कोरोनामुळे कुटुंबातील सदस्य गमावलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी राज ठाकरेंनी लिहले ‘हे’ खास पत्र
- ‘आज रात्रीपर्यंत काहिही होऊ शकते, मित्रानो तुम्हा सर्वांची खूप जास्त आठवण येईल’; शालूची भावूक पोस्ट
- मराठा समाजाला ओबीसीत समाविष्ट केल्यास कुठलेही दुष्परिणाम होणार नाहीत – विनोद पाटील
- ‘तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी आयसीयूची व्यवस्था सुरू करणार’ – अरविंद निलंगेकर


