🕒 1 min read
मुंबई – गेल्या काही दिवसांपासून योग गुरू बाबा रामदेव आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आहेत. अॅलोपॅथी बाबतच्या विधानावरून मोठा वादंग निर्माण झाल्यावर अखेर रामदेव यांनी सोमवारी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअ;ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचे रामदेव यांनी जाहीर केलं. रामदेव यांचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं.
यानंतर आता बाबा रामदेव यांनी कोरोना लस घेवून करोनाशी लढत असताना मरण पावलेल्या डॉक्टरांबद्दल वक्तव्य केलं असून व्हिडीओ व्हायरल होतोय. यामुळे देखील वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.तर दुसऱ्या बाजूला आता बाबांची चांगलीच खरडपट्टी एका जेष्ठ डॉक्टरांनी काढली असून आता हा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.
बाबा रामदेव यांच्या अॅलोपॅथीसंदर्भातील व्हिडिओनंतर आयोजित आज तकच्या डिबेट शोमध्ये डॉ. जयेश लेले आणि बाबा रामदेव यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. डॉ. लेले अॅलोपॅथीसंदर्भात बोलत असताना बाबा रामदेव मध्ये-मध्ये बोलत असल्याने लेले यांच्या बोलण्यात व्यत्यय येत होता. त्यावरुन, डॉ. लेले चांगलेच संतापले होते. ऐ चुप्प… चुप्प… असे म्हणत लेले यांनी रामदेव बाबांची बोलती बंद केली. त्यानंतर, बाबांनीही प्रतिक्रिया देत आप कौन है.. मुझे चुप बैठानेवाले असे म्हणत उत्तर दिले. मात्र, सोशल मीडियावर डॉ. लेले यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्यांना समर्थन मिळत आहे.तर काहीजण डॉ. लेलेंना ट्रोलही करत आहे.
डॉक्टर लेले हे मूळ महाराष्ट्रातील मुंबईचे असून सध्या जनपद येथे मेडीकल प्रॅक्टीस करत आहेत. लेले इंडियन मेडिकल असोसिएशनेच सरचिटणीस आहेत. यापूर्वी महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. जयेश लेले हे बालरोगतज्ञ असून वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना अनेकदा सन्मानित करण्यात आल आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- चंद्रकांत पाटलांचे ‘ते’ विधान मराठा आरक्षण संघर्षातील शहिदांचा अपमान करणारे – कॉंग्रेस
- बारावीच्या परीक्षांचा निर्णय लवकरच; राज्य सरकारांना २५ मे पर्यंत सूचना देण्याची वेळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

