Share

मोठी बातमी! आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; ‘या’ खेळाडूला बनवलं कॅप्टन!

Published On: 

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेली पाच सामन्यांची टी-२० मालिका संपल्यानंतर भारतीय संघ आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ आयर्लंड विरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या भारतीय संघाची घोषणा बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) यांच्याकडून करण्यात आली. बीसीसीआयने घोषीत केलेल्या या १७ सदस्यीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आले आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निवड करण्यात आलेल्या संघातील अनेक खेळाडूंना आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी ही संधी देण्यात आली आहे. तर आयर्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी संघात नव्याने संजू सॅमसंग, दीपक हूडा, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी यांचाही समावेश करण्यात आला आहे. भारत आयर्लंड दौर्‍यावर २६ जून ते २८ जून पर्यंत क्रिकेट खेळणार आहे. या दोन्ही संघातील पहिला सामना 26 जूनला डब्लिन येथील मैदानावर खेळायला जाईल. भारतीय वरिष्ठ खेळाडूंचा संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असल्याने अनेक नवीन चेहऱ्यांना या मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणार्‍या ऋषभ पंतला स्थान दिलेले नाही. कदाचित ऋषभ पंतचा सामावेश इंग्लंड दौऱ्यातील कसोटी सामन्यासाठी केला जाईल. बीसीसीआय क्रिकेटमध्ये प्रगत नसलेल्या देशांचीसाठी प्रोत्साहनात्मक म्हणून द्विपक्षीय क्रिकेट खेळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे सोपवले आहे. तर संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी नुभवी गोलंदाज भुवनेश्‍वर कुमारकडे देण्यात आली आहे.

आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघ-

हार्दिक पंड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), इशान किशन, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, व्यंकटेश अय्यर, दीपक हुड्डा, राहूल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आर. बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!