मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. पहिल्या दोन सामन्यात दक्षिण आफ्रिकाने विजय मिळवला होता. भारतीय क्रिकेट संघाने अखेरीस दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवला. तिसऱ्या टी-२० सामन्यात पाहुण्या संघाचा ४८ धावांच्या फरकाने पराभूत करून मालिकेतील आव्हान कायम ठेवले. या विजयाने संघात काही प्रमाणात समाधान व्यक्त केले जात असले तरी कर्णधार ऋषभ पंत अजूनही समाधानी नाही.
सामन्यानंतरच्या सादरीकरणात बोलताना पंतने मान्य केले की तो या निकालावर पूर्णपणे खूश नाही कारण टीम इंडियाने खूप विकेट गमावल्या. किंबहुना, पंतला असेही वाटले की भारतीय संघ बरोबरीच्या धावसंख्येपेक्षा १५ धावांनी कमी पडला आहे. पण, गोलंदाजांनी केलेली कामगिरी पाहून आनंद झाला.
पंतने निराशा का व्यक्त केली
“गोलंदाज आणि फलंदाजांकडूनही कामगिरी योग्य होती. आम्ही १५ धावांनी कमी मागे होतो, पण आम्ही त्याबद्दल विचार करत नव्हतो. गोलंदाजांनी आमच्यासाठी अप्रतिम कामगिरी केली. भारतात फिरकीपटूंची मोठी भूमिका असते आणि त्यांच्यावर दबाव असतो, जेव्हा ते छान करतात तेव्हा असे सामने होतात. जेव्हा तुम्ही चांगली सुरुवात करता, तेव्हा नवीन फलंदाज येणे आणि लगेच मोठे फटके खेळणे कठीण असते. आम्ही खूप विकेट गमावल्या. आम्ही पुढील सामन्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला हे सुनिश्चित करावे लागेल की आम्ही मोठ्या फरकाने खेळ पूर्ण करू,” तो सादरीकरण समारंभात म्हणाला.
दमदार सुरुवातीनंतर डाव गडबडला
ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली आणि दोघांनीही प्रत्येकी अर्धशतक ठोकले. मात्र श्रेयस अय्यर, ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक या खेळाडूंना एकूण धावसंख्येमध्ये फारशी भर घालता आली नाही आणि ते स्वस्तात बाद झाले. अखेरीस, हार्दिक पंड्या आणि (२१ चेंडूत ३१) अक्षर पटेल (२ चेंडूत ५) नाबाद राहिले आणि भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभारली.
या विजयाच्या जोरावर भारताने मालिकेत आपले खाते उघडले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत आव्हान कायम ठेवले आहे. पण पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ मालिका जिंकण्यापासून केवळ एक विजय दूर आहे, तर भारताला उर्वरित दोन सामने जिंकणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील चौथा टी-२० सामना १७ जूनला राजकोट येथे खेळला जाणार आहे. भारताने विशाखापट्टणम येथे खेळायला तिसरा सामना जिंकून मालिकेत २-१ असे पुनरागमन केले आहे. अजूनही भारतासाठी प्रत्येक सामना हा ‘करो या मरो’ स्थितीचा असणार आहे. भारताला ही ५ सामन्यांची टी-२० मालिका जिंकण्यासाठी पुढील दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे. सलग तिसऱ्या सामन्यातही भारताने त्यांच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणताही बदल केला नव्हता. राजकोट येथील चौथ्या सामन्यातही भारतीय संघ कोणताही बदल न करता मैदानात उतरू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

