🕒 1 min read
मुंबई : भारतात सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध टी-२० सामने सुरू आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारत दौर्यावर आलेला आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. तर भारतीय संघासमोर पुढच्या महिन्यात इंग्लंडच आव्हान असणार आहे. भारताला इंग्लंड दौऱ्यात १ कसोटी सामना, ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळायचे आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये मागच्यावर्षी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एक सामना शिल्लक राहिला होता. कोरोना व्हायरसमुळे हा कसोटी सामना रद्द झाला होता. ती कसोटी १ ते ५ जुलै दरम्यान होणार आहे. भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. मात्र त्याआधी उपकर्णधार के.एल.राहुलला अग्निपरीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत नापास झाल्यास, त्याचं इंग्लंडच तिकीट रद्द होऊ शकतं. दुखापतीमुळेच केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली होती. इंग्लंड विरुद्ध एजबॅस्टन येथे होणाऱ्या कसोटीत तो खेळणार की नाही? यावर मात्र अजून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागेल
भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा च्या जागी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी केएल राहुलची कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. पण मालिका सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला त्याने दुखापतीमुळे माघार घेतली. राहुल बाहेर गेल्यानंतर त्याच्याजागी ऋषभ पंतला कर्णधार बनवण्यात आलं. क्रिकबजच्या वृत्तानुसार, राहुल कधीपर्यंत मैदानाबाहेर राहील, याबद्दल काही स्पष्टता नाहीय. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणं मुश्किल आहे. तो एकदिवसीय आणि टी-२० मध्ये खेळण्याबद्दलही साशकंता आहे. इनसाइड स्पोट्ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुलला शनिवारी एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.
रिप्लेसमेंटचा विचार होण्याची शक्यता कमी
भारताचा पहिला ग्रुप उद्या १६ जूनला तर दुसरा ग्रुप १९ जूनला रवाना होणार आहे. निवड समिती केएल राहुलच्या जागी रिप्लेसमेंटचा विचार करण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांनी आधीच १७ सदस्यीय संघ जाहीर केलाय. यात तीन सलामीवीर आहेत. रोहित शर्मा, शुभमन गिल हे दोन सलामीवीर आहेत. टीम मॅनेजमेंटने मागणी केली, तर मयंक अग्रवालला संधी मिळू शकते. मात्र आशिया कप आणि विश्वचषकासारख्या स्पर्धा तोंडावर आल्या असताना केएल राहुलची दुखापत संघासाठी डोकेदुखी ठरेल.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
