Share

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट; चाहते म्हणतायत…!

Published On: 

मुंबई : पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू बाबर आझमची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. तो सध्या आयसीसी एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा क्लीन स्वीप केला होता. यादरम्यान बाबरने विश्वविक्रमही केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग ३ शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. पुढील दोन वर्षे त्याच्यासाठी महत्त्वाची असणार आहेत. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. त्यानंतर पुढील वर्षी एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे. दोन्ही स्पर्धांमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंजक सामना पाहायला मिळेल.

बाबर आझमने आयसीसीकडून मिळालेल्या कॅपचा फोटो शेअर करताना लिहिले की, मेहनतीचे फळ मिळाले. गेल्या वर्षी बाबरला आयसीसीच्या टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही संघात स्थान मिळाले होते. त्याने तीच टोपी शेअर केली आहे. गेल्या वर्षी बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने टी-२० विश्वचषकात भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानच्या संघाला भारतीय संघाचा पराभव करण्यात यश आले होते. बाबरच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी लिहिले की, तू क्रिकेटचा राजा आहेस.

तिन्ही क्रमवारीत कोहलीच्या पुढे

बाबर आझम कसोटी क्रमवारीत ८१५ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ७४२ गुणांसह १०व्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत बाबर ८९२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. कोहली ८११ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. टी-२० बद्दल बोलायचे झाले तर इथे पाकिस्तानचा कर्णधार कोहलीच्या खूप पुढे आहे. बाबरचे ८१८ गुण आहेत आणि तो पहिल्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे कोहली टॉप-२० मध्येही नाही. ५९४ गुणांसह तो २१व्या क्रमांकावर घसरला आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेमुळे कोहलीला क्रमवारीत वर जाण्याची संधी होती. मात्र बीसीसीआयने या मालिकेसाठी वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आहे. २ महिन्यांहून अधिक काळ खेळाडू आयपीएलमध्ये व्यस्त होते. टीम इंडिया १६ जूनला इंग्लंडला रवाना होत आहे. १ जुलैपासून त्याला तेथे कसोटी खेळायची आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामने होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!