मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळी सतत चर्चेत आहे. ही अभिनेत्री सोशल मिडीयावर खूप सक्रीय असते. नुकतीच ‘रानबाजार’ ही तिची मराठी वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. यानंतर तिचा ‘वाया’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी प्राजक्ताने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. यावेळी वाया चित्रपटाची शूटिंग चालू होती त्यावेळी प्राजक्ताचा ब्रेकअप झाला होता. ब्रेकअपदरम्यान शूटिंगचा अनुभव कसा होता याबद्दल तिने सांगितले आहे.
प्राजक्ता म्हणाली, शुटींगच्या वेळी माझा ब्रेकअप झाला होता. त्यामुळे मी माझ्या खासगी आयुष्याच्या विचारांमध्ये व्यस्त होते. मी काय करते, कुठे आहे या गोष्टींची मला कप्लना पण नसायची. चित्रपट पाहताना दिग्दर्शक मला म्हणाले तू इथे पडली, इथे चुकीचा डायलॉग बोलीली हे आठवतय का तुला? यावर मी फक्त हो म्हटले पण मला काहीच आठवत नव्हते.
या चित्रपटामध्ये मुक्ता बर्वे हि शासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. त्याचबरोबर प्राजक्ता माळी, नंदू माधव, ओंकार गोवर्धन, रसिक चव्हाण, सुहास शिरसाट, संदीप पाठक अशा अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

