UP Elections: योगी आदित्यानाथांचा सामना २६ वर्षांपासून आंदोलनावर असलेला शिक्षकाविरोधात

उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश हे लोकसंख्येच्या दृष्टी भारतातले सर्वात मोठे राज्य आहे. इथे ४०३ विधानसभा आणि ८० लोकसभा जागा आहेत. त्यामुळे लोकसभेची निवडणूक असो किंवा राज्याच्या निवडणुका, संपूर्ण देशाचं लक्ष उत्तरप्रदेशकडे लागलेलं असतं आणि इथल्या राजकारणाचा एक वेगळा ढंग आहे आणि इथे विचित्र विचित्र घटना घडत असतात. तशीच एक नाविन्यपूर्ण घटना यावर्षी ही घडत आहे.

उत्तरप्रदेशमधील एक निवृत्त शिक्षक विजय सिंह उत्तरप्रदेशचे योगी आदित्यानाथांच्या विरोधात गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. तसेच ते सप प्रमुख अखिलेश यादवांच्या विरोधात करहलमध्ये ते प्रचार करणार आहेत. उत्तरप्रदेशमध्ये एकेकाळी शिक्षक म्हणून काम करणारे विजय सिंह हे भ्रष्टाचार कार्यकर्ते आहेत. विजय सिंग गेल्या २६ वर्षांपासूनमुजफ्फरनगरमध्ये धारणा आंदोलनावर बसले आहेत. त्यांचे हे आंदोलन लँड माफियांच्या विरोधात आहे. मुजफ्फरनगरमधील हजारो एकर जमीन लँड माफियांनी खाल्ल्याचा त्यांचा आरोप आहे. ते योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात नऊ तारखेला अर्ज भरणार आहेत. त्यांची निवडणूक ही ‘सबसे सस्ता चुनाव’ असणार आहे, असे त्यांनी म्हणाले आहे.

गोरखपूर मतदार संघासाठी 11 फेब्रुवारीला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे तर तिथे तीन मार्चला निवडणुका होतील उत्तर प्रदेशच्या निवडणुकांचा निकाल 10 मार्चला लागेल. ते म्हणाले, ‘गेल्या सव्वीस वर्षांमध्ये कोणतेही सरकार भ्रष्टाचार विरोधात लढण्यासाठी आणि माफियांविरोधात कारवाई करण्यासाठी गंभीर दिसत नाही. हेच लोकांना सांगण्यासाठी मी या निवडणुकीत उतरलो आहे. १९९० मध्यामध्ये कामाला जात असताना एक लहान मुलगा त्याच्या आईकडे रडत चपाती मागत होता, पण त्याच्या आई त्याला चपाती देता आली नाही. ते मी पाहिलं. एकीकडे मुजफ्फरनगरमध्ये हजारो एकर जमीन राजकारण्यांनी आहे लुटली आहे आणि दुसरीकडे लोक उपाशी मरत आहेत. त्यामुळे धरणे आंदोलनावर बसलो. पण आजपर्यंत कोणीही माझी दखल घेतली नाही. म्हणून मी आता निवडणुकीचा मार्ग निवडला आहे.’

महत्वाच्या बातम्या: