संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराला जेलमध्ये जावे लागणार- किरीट सोमय्या

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya) आज शिवसेना खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर विरुद्ध(Sujit Patkar) पुण्यातील जंबो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल करणार असून याप्रकरणी त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. तसेच या संदर्भात त्यांनी प्रसार माध्यमांशी देखील संवाद साधला असून संजय राऊत आणि मित्र परिवाराला जेलमध्ये जावे लागणार, असेही सोमय्या म्हणाले आहेत.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना किरीट सोमय्या म्हणाले आहेत की,‘संजय राऊत(Sanjay Raut) यांच्यामुळे सुजीत पाटकरला कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. तसेच राऊत यांच्या दोन्ही मुलींचा व्यवहारामध्ये समावेश असल्याचेही ते म्हणाले. शिवाय पत्रकार पांडुरंग रायकर यांचा देखील तेथेच मृत्यू झाला. रायकर ज्या कोविड सेंटरमध्ये अॅडमिट होते, तो कोविड सेंटर संजय पाटकर यांचा होता. त्यांनी व्यवस्थित सर्विस न दिल्यामुळे रायकर यांचा मृत्यू झाला. त्यामुळे संजय राऊत आणि त्यांच्या मित्र परिवाराला जेलमध्ये जावे लागणार,’ असे सोमय्या म्हणाले आहेत.

दरम्यान,आपल्या ट्विटमध्ये सोमय्या म्हणाले आहेत की, ‘आज दुपारी ४ वाजता मी शिवाजी नगर पुणे जंबो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत पार्टनर सुजित पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार आहे. कोविड रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी ही तक्रार मी दाखल करणार आहे. त्यांनी खोटे डॉक्युमेंट्स देऊन कॉन्ट्रॅक्ट मिळविला.’

महत्वाच्या बातम्या: