बुरखा घालून आलेल्या विद्यार्थिनींना शाळेतून बाहेर काढले

कुंडपूरा, कर्नाटक: भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ – २८ मध्ये देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे स्वतंत्र दिले आहे. परंतु कर्नाटकात मागील काही दिवसांपासून संविधानाने दिलेल्या अधिकारांपासून सामान्य जनतेला वंचित ठेवले जात आहे. गेले काही दिवस शाळेत बुरखा घालून येणाऱ्या विद्यार्थिनींना शाळा प्रशासनाने प्रवेश नाकारला आहे.

काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील उडीपी या गावी बुरखा घातल्याने सहा विद्यार्थिनींना शाळेने बंदी घातली होती. त्याविरोधात त्यांनी त्यांना बुरखा घालू द्यावा, तो त्यांचा संविधानिक अधिकार असल्याचे सांगितले. आता पुन्हा कुंडपूरा येथील शाळेने देखील हाच प्रकार केल्याचे समोर आले आहे.  विद्यार्थिनींना शाळेच्या दारावर ठिय्या मांडून धर्मनिरपेक्ष भारतीय न्यायव्यवस्थेकडे न्यायाची अपेक्षा केली आहे.

शाळेच्या गणवेशाच्या आड हा बुरखा (हिजाब) येत आहे. शाळेचा गणवेश भारतीय राज्यघटनेने दिलेल्या धर्माचे स्वतंत्र (Freedom of Expression) च्या आड येत आहे का? असा प्रश्न आता पडला आहे. मुस्लिम समाजातील इतर अशाच अनेक गोष्टींवर सार्वजनिक ठिकाणी पडसाद उमटत असतात. परंतु बुरखा (हिजाब) घातल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबल्याचे धर्मनिरपेक्ष भारतात पहिल्यांदाच घडत आहे. भारतीय राज्यघटनेत सर्वांना, सर्व धर्मियांना, धर्माचे, भाषेचे, पोषाखाचे स्वतंत्र दिले आहे. ओढणीचा स्कार्फ (बुरखा) बांधणे याने शाळेच्या गणवेशात काही विशेष फरक पडत नसून हा केवळ त्या धर्मियांवर उगवलेला सूड असल्याचे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या: