गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आगामी निवडणुकीबाबत आत्मविश्वास

गोवा: भारतीय निवडणूक आयोगाने भारतातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. उत्तरप्रदेश,पंजाब, उत्तरप्रदेश, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यात निवडणूका होणार आहेत. भारतातील सर्वच राजकीय पंडितांचे लक्ष उत्तरप्रदेश या राज्याकडे लागले असतानाच गोवा या भारतातील सर्वात छोट्या राज्यात पण राजकीय घडामोडींनी वेग पकडला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आम्हीच पूर्ण बहुमताने निवडणूका जिंकणार असल्याचा दावा करीत आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोवा राज्याचे प्रभारी आहेत. गोवा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ.प्रमोद. सावंत हे  देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पक्षाचा प्रचार करीत आहे. गोवा राज्यात  भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष असताना  तृणमूल काँग्रेसने देखील राज्याच्या राजकरणात उडी घेतली आहे.

परंतु गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगामी निवडणुकीत आम्हीच विजयी होणार असून तृणमूल काँग्रेस हा आमचा प्रमुख विरोधी पक्ष नसणार तर काँग्रेस हाच आमचा प्रमुख विरोधी पक्ष असणार आहे. परंतु त्यांना पण पाचच्या वर जागा जिंकता येतील असं वाटत नाही.

          महत्वाच्या बातम्या :