अमृता फडणवीसांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले,‘कॉमेडीला टीव्हीवर…’

मुंबई : काल(४ फेब्रु.)भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस(Amruta Fadanvis)यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असतांना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. त्यानंतर अमृता यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. याच मुद्द्यावर आज मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे यांनी आज(५ फेब्रु.)जोगेश्वरी पूर्व इथल्या पुनम नगर महापालिका शाळेच्या बास्केटबॉल कोर्ट चे उद्घाटन केले. तद्पश्चात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना आदित्य यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी अमृता फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर केले टीकेसंदर्भात विचारण्यात आले असता ते म्हणाले की,‘कॉमेडीला टीव्हीवर राहूदेत, आपण राजकिय काम आणि उदीष्टाला महत्त्व द्यायचं’, असे आदित्य म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘शिवसैनिकांना कुठल्या बास्केटमध्ये कुठला बॉल टाकायचा हे माहिती आहे. निवडणुकीला अद्याप वेळ आहे.निवडणूक सुरु होतील तेव्हा आपण त्यावर बोलू चांगली काम होत असतात ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत. निवडणुकीच्या वेळेला विरोधकांना प्रचारात उत्तर देऊ,’असे आदित्य म्हणाले.

महत्वाच्या बातम्या: