अफगाणिस्तानचा मोहंमद शेहजाद अडकला मोठ्या वादात ; फोटो व्हायरल

मुंबई : भारतात आयपीएल सुरु व्हायला काही कालावधी असला तरी दुसऱ्या देशात त्यांच्या लीग सुरु आहे. बिग बॅश, पाकिस्तान सुपर लीग आणि बांगलादेश प्रीमियर लीग अशा काही लीग सध्या खेळल्या जात आहेत. यातूनच बांग्लादेश प्रीमियर लीगमधून एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो अफगाणिस्तानच्या मोहंमद शेहजादचा आहे. त्याच्यावर या फोटो संबंधी कारवाई सुद्धा करण्यात आली आहे.

शेहजाद शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियममध्ये स्मोकिंग करताना दिसला आहे. अनेक प्रसारमाध्यमांनी शेहजादचे स्मोक करतानाचे फोटो काढले आहेत. यात तो त्याच्या टीममेटसमोर उभा राहून मैदानात स्मोकिंग करताना दिसत आहे. शेहजादच्या दंडात्मक खात्यात एक डिमेरिट पॉइंट देखील जोडला गेला आहे. कारण शेहजादने बीसीबी आचारसंहितेच्या कलम २.२०चे उल्लंघन केले आहे. ज्याचा संबंध ‘खेळाच्या जाणीवेच्या विरुद्ध वागणूक’ शी आहे. सामना अधिकाऱ्यांनी अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक-फलंदाज मोहम्मद शेहजादला यासंबंधी फटकारले आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शेहजादने दोषी असल्याचे कबूल केले आहे आणि सामनाधिकारी नियामुर रशीद यांनी सुचवलेली शिक्षा मान्य केली आहे. या कारणास्तव, कोणत्याही औपचारिक सुनावणीची आवश्यकता नव्हती. शेहजादचे मैदानावर धूम्रपान करतानाचे फोटो अनेक माध्यमांनी क्लिक केले आहेत. ढाक्याचे प्रशिक्षक मिझानुर रहमान यांनीच शेहजादला मैदानावर धुम्रपान न करण्याची ताकीद दिली होती, असे वृत्त आहे. त्यानंतर तमीम इक्बालने शेहजादला ड्रेसिंग रूममध्ये जाण्यास सांगितले. मात्र शेहजादचे स्मोक करतानाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.

महत्वाच्या बातम्या