सेहवागला माहिती होते कि कुंबळे प्रशिक्षकपद सोडणार?; नवीन पुस्तकात खुलासा

मुंबई: २०१७मध्ये भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील झालेला वाद हा भारतीय क्रिकेटच्या “खराब काळ” राहिला आहे. जून २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर कुंबळेने प्रशिक्षक म्हणून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. कुंबळेने पद सोडण्याचे कारण विराट असल्याचे बोलले जात होते. आता मात्र, टीम इंडियाचे माजी व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी त्यांच्या ‘ऑन बोर्ड: टेस्ट.ट्रायल.ट्रायम्फ’ या पुस्तकात खुलासा केला आहे. कुंबळेच्या पद सोडणार असल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती आणि माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने शेट्टी यांना माहिती दिली होती.

वानखेडे स्टेडियममध्ये आयपीएल खेळादरम्यान दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सेहवाग यांची भेट झाल्याची आठवण शेट्टीने सांगितली, बीसीसीआयचे माजी महाव्यवस्थापक मातुरी व्यंकट श्रीधर यांनी त्यांना भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला होता.” मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील आयपीएल सामन्याच्या पूर्वसंध्येला मी वानखेडे स्टेडियमवर वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरला भेटलो. जेव्हा वीरूने मला सांगितले की डॉ. श्रीधर यांनी सल्ला दिला होता कि मी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा तेव्हा मी आश्चर्यचकित झालो होतो.” शेट्टी यांनी पुढे झालेल्या बैठकी बद्दल सांगितले.

” काही दिवसांनी मी आयपीएल फायनलसाठी हैदराबादला गेलो होतो. सामन्यापूर्वी प्रशासक समितीची बैठक झाली. अनिल कुंबळे आणि विराट कोहली या बैठकीत भारतीय क्रिकेटच्या पुढील वाटचालीचे प्रेझेंटेशन देणार होते. या बैठकीत विनोद राय आणि डायना एडुलजी (प्रशासकीय समिती) दोघेही सहभागी झाले होते. कुंबळे स्वतः या बैठकीला उपस्थित होते, तर विराट या बैठकीत वर्च्युअली सहभागी होणार होता. या बैठकीच्या सुरुवातीनंतर विनोद राय यांनी मला विचारले की २०१६ मध्ये टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यासाठी बीसीसीआयने काय प्रक्रिया केली होती. मात्र पुढे जे घडले ते धक्कादायक होते. कारण विनोद राय यांनीही या बैठकीला हजेरी लावली होती, ज्यात कुंबळेचाही सहभाग होता, तीच प्रक्रिया लवकरच पुन्हा करावी लागणार आहे असे ते म्हणाले. हे ऐकून अनिल कुंबळे आणि मी थक्क झालो. या भेटीपूर्वी वीरेंद्र सेहवागसोबत झालेला संवाद मला आठवला आणि मी ते कुंबळेसोबत शेअर केले. मी हे ठामपणे सांगू शकतो की डॉ. श्रीधर यांनी वीरेंद्र सेहवागला प्रशिक्षकपदासाठी अर्ज न करण्यास सांगितले असावे. ”

महत्वाच्या बातम्या