Share

“तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या व्यक्तीने… ” ; सुनील शेळकेंचा गोपीचंद पडळकरांवर घणाघात

Published On: 

पुणे : भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर बोलताना जिभ घसरली होती. बाळासाहेबांच्या एका वक्तव्याचा त्यांनी संदर्भ दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि गोपीचंद पडळकर, असा सामना पुन्हा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी पडळकरांना जशास-तसे उत्तर दिले आहे.

सुनील शेळके म्हणाले, “हे वक्तव्य जाणीपूर्वत केले जातात. या देशाच्या जडणघडणीमध्ये पवार साहेबांचे ५० वर्षाचे असलेले योगदान संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी कुठलही वक्तव्य केल तर राज्यातील जनता ते स्विकारत होती. मात्र बाळासाहेब काय बोलले हे आज तुझ्यासारख्या लायकी नसलेल्या व्यक्तीने बोलणे शोभणारे नाही. त्यामुळे गोपीचंद पडळकरांनी आपली लायकी पाहून बोलावे.”

देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आत्मचिंतन केल पाहिजे

“पडळकरांनी ज्यांना गुरु मानलं त्या देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा आत्मचिंतन केल पाहिजे. त्यांनी त्यांच्या पिलावळांना समजून सांगितले पाहिजे. उगाच आपल्याला विधान परिषद दिली म्हणून आपण कुणावरी तोंड टाकायचं. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. पडळकरांना ते राहतात त्या ग्रांमपंचायतीमध्ये किंमत नाही. विधान सभेत देखील तुम्ही काय दिवा लावता हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुमचे डिपॉझिट जनता जप्त करते. तुमची लायकी असेल तर एकदा मावळात येऊन उभे राहा म्हणजे तुम्हाला तुमची लायकी कळेल. पडळकरांसाख्या बेताल आणि जाबऱ्या बोलणाऱ्या व्यक्तिला आपण महत्व देऊ नये,” असा घणाघात सुनील शेळके यांनी पडळकरांवर केला.

काय म्हणाले होते पडळकर?

“नाशिक जिल्ह्यात कांदा प्रश्नावर आंदोलन करत असताना शेतकऱ्यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यावेळेस शेतकऱ्यांनी रक्त न सांडता इकडे येऊन शरद पवार यांच्या *** वर लाथ घाला, असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते. लाथ घातल्यानंतर ते बेशुद्ध पडतील. त्यानंतर त्यांना कांद्याचा वास द्या, ते शुद्धीवर आल्यानंतर कांद्याचे दर वाढतील, असे बाळासाहेब म्हणाले होते, आता उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचे पालन करणार का?”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!