🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते व राज्याचे मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध ईडीकडे तक्रार नोंदवल्यानंतर आणि ईडीने तत्परतेने अनिल परब यांच्यावर कारवाई केल्यानंतर भाजप आणि शिवसेना मधील वाद टोकाला गेल्याचे दिसून येत आहे. शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद तर सर्वश्रुत आहे. नुकतेच सोमय्या यांनी शोले या चित्रपटतील डॉयलॉग “अब तेरा क्या होगा कालिया” असे म्हणत अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांना डिवचले होते. आता या सर्व पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची पोलीस महासंचालक कार्यालय येथे जाऊन भेट घेतली. या भेटीत दापोली साई रिसॉर्टचे मालक अनिल परब यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यासंदर्भात ही भेट घेतली असल्याचे सोमय्या यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.
यावेळी माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले की, “साई रिसॉर्ट हे अनधिकृत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश पर्यावरण मंत्रालय केंद्र सरकार तसेच महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. या संदर्भात आम्ही तीन वेळा दापोली पोलीस स्टेशन मध्ये तसेच पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केली आहे. राज्य सरकारने दिलेला रिसॉर्टचा एन ए अनधिकृत असून, फ्रॉड सर्जरी करून प्राप्त करण्यात आला आहे, असा अहवाल दिला आहे. आम्ही दापोलीतील दोन रिसॉर्ट मालकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. परंतु साई रिसॉर्टच्या मालकाविरुद्ध अजून पर्यंत तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे ताबडतोब याची दखल घेत तक्रार दाखल करावी आणि कारवाई करावी अशी आमची मागणी आहे”
किरीट सोमय्यांनी थेट पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेतल्याने आता राजकीय वर्तुळात याची चर्चा होत आहे. पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्या भेटीनंतर आता अनिल परबांवरील कारवाईला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
