Share

IPL 2022 : “छोटा पोरगा आहेस, तसाच राहा…”, रियान परागचा हर्षल, सिराजसोबतच्या भांडणावर खुलासा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये सर्वात मोठा वाद म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे खेळाडू आणि राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रियान पराग यांच्यातील मैदानावरील भांडण. मोसमातील ३९व्या सामन्यात हे दोन संघ आमनेसामने आले. रियान परागने कठीण परिस्थितीत फलंदाजी करत राजस्थानसाठी ५६ धावांची खेळी खेळली. संघाचा डाव संपल्यानंतर रियानची बंगळुरूच्या मोहम्मद सिराज आणि हर्षल पटेलशी बाचाबाची झाली.

रियान परागने हर्षल आणि सिराजसोबत झालेल्या वादामागची कहाणी सांगितली. लाइव्ह स्ट्रीमिंगवर बोलताना २० वर्षीय रियान म्हणाला, ”गेल्या वर्षी २०२१ मध्ये जेव्हा आम्ही मुंबईत आरसीबीसोबत खेळत होतो तेव्हा हर्षल पटेलने मला बाद केले. मी शांतपणे परत जात होतो, मग त्याने मला हाताने इशारा केला की चल जा. तेव्हा मला ते दिसले नाही, मी हॉटेलमध्ये जाऊन पाहिले. ते माझ्या मनात राहिले. शेवटच्या षटकात जेव्हा मी त्याच्याविरुद्ध चांगली फलंदाजी केली, तेव्हा मी माझ्या तोंडून काहीच बोललो नाही. मी पण हाताने इशारा केला. ना मी तोंडातून काही बोललो, ना त्याला शिवीगाळ केली.”

रियान पराग म्हणतो की, तो हर्षल पटेलशी बोलला होता, पण सिराजने त्याला बोलावले. तो म्हणाला, ”हर्षल काहीच बोलला नाही. सिराज विनाकारण बोलावत होता. सिराज मला हाक मारून म्हणाला, ओए इकडे ये. छोटा पोरगा आहेस, त्यामुळे तसाच राहा.” मग मी त्याला म्हणालो, ”भावा मी तुला दाखवत नव्हतो,. तुला काहीच बोलत नव्हतो. त्यानंतर टीमचे सदस्य आले आणि प्रकरण संपले.”

हा सामना संपल्यानंतर हर्षल पटेलने रियान परागशी हस्तांदोलन केले नाही. सामनावीर रियान परागची धडाकेबाज फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजांची चमक यामुळे राजस्थानने हा सामना २९ धावांनी जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!