Share

मराठी पाट्यांबाबत १२ तारखेचा मनसेचा अल्टिमेटम, अन्यथा खळखट्याक

Published On: 

मुंबई : दुकाने आस्थापनांना प्रमुख नामफलक मराठी भाषेत लावण्याबाबतच्या सूचना पालिकेने दिल्या होत्या. मात्र अद्याप बहुतांश दुकानांचे प्रमुख नामफलक इंग्रजीमध्ये दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांनी आज पालिका आयुक्तांची भेट घेत पालिकेला निवेदन सादर केले. येत्या १२ तारखेपर्यंत दुकानावरील पाट्या मराठीत झाल्या पाहिजेत. अन्यथा बारा तारखेनंतर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाला दिला आहे.

शासनाच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने दुकानावरील प्रमुख नामफलक म्हणजेच पाट्या मराठीत लावा, अशा सूचना दिल्या होत्या. अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागेल, असा इशारा देखील दिला होता. मात्र अद्यापही कल्याण डोंबिवलीत अनेक दुकानदारांचे प्रमुख नामफलक इंग्रजीमध्ये दिसून येत आहेत. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर , जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर आदी पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांची भेट घेत निवेदन सादर केलं. मराठी पाट्यांबाबत पालिकेला १२ तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!