Share

आता वर्षातून दोनदा IPL खेळवली जाईल..! कॉमेंटेटर आकाश चोप्राची भविष्यवाणी!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने आयपीएल (IPL) स्पर्धेबाबत धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. वर्षातून दोनदा आयपीएलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्याने सांगितले आहे. आकाश चोप्राच्या मते, पुढील पाच वर्षांनंतर आयपीएल निश्चितपणे वर्षातून दोनदा आयोजित केली जाईल.

याआधी टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी टी-२० क्रिकेटबाबत आपले मत व्यक्त केले होते. टी-२० क्रिकेटमध्ये द्विपक्षीय मालिकेची गरज नसून केवळ टी-२० विश्वचषकच व्हायला हवा, असे ते म्हणाले होते. ”हे फुटबॉलसारखे पाहिले पाहिजे, जिथे टी-२० क्रिकेटमध्ये तुम्ही फक्त विश्वचषक खेळता. द्विपक्षीय स्पर्धा कोणालाही आठवत नाही पण विश्वचषक सर्वांना आठवतो. तुम्ही जगभरात फ्रेंचायझी क्रिकेट खेळता. प्रत्येक देशाला त्यांचे स्वतःचे फ्रेंचायझी क्रिकेट खेळण्याची परवानगी आहे, जे त्यांचे देशांतर्गत क्रिकेट आहे आणि त्यानंतर, दर दोन वर्षांनी तुम्ही येऊन विश्वचषक खेळता”, असे शास्त्रींनी सांगितले.

आकाश चोप्राने म्हटले, ”आयपीएल वर्षातून दोनदा आयोजित केले पाहिजे. आता हे होणार नाही आणि पुढची पाच वर्षं ते घडणार नाही पण त्यानंतर हे नक्की होईल. शंभर टक्के आयपीएल वर्षातून दोनदा आयोजित केली जाईल. पहिली आयपीएल मोठी असेल. ज्यामध्ये ९४ सामने होतील आणि त्यानंतर दुसरी लहान आयपीएल असेल जी एक महिन्याची असेल ज्यामध्ये संघ एकमेकांशी कधीतरी खेळतील.”

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!