‘पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’, भातखळकरांची मागणी

मुंबई : काल(५ जाने.)पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra  Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेबाबत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केली आहे.

यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’ही हलगर्जी की कारस्थान? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत हयगय करणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, याप्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी स्पष्टीकरण दिले असून ते म्हणाले आहेत की,’पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यातील सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळल्या असतील तर त्याची आम्ही चौकशी करू. पंतप्रधानांना या दौऱ्यामध्ये कोणताही धोका नव्हता. फिरोजपूर जिल्ह्यात दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदींना (PM Modi) परतावं लागलं याबद्दल मी खेद व्यक्त करतो. आम्ही आपल्या पंतप्रधानांचा आदर करतो’, असे चन्नी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या: