भाजप नेते राम सातपुते कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती

मुंबई: दक्षिण अफ्रिकेत आढळलेला ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यात कोरोना रुग्णसंख्येतही दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली असून ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील सातत्याने वाढ होत आहे. जर कोरोना रुग्णसंख्या अशीच वाढत राहिली तर लॉकडाऊनबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. अशातच आता राजकीय नेत्यांनाही कोरोनाने गाठले आहे.

दरम्यान भाजप नेते राम सातपुते यांनाही आता कोरोनाने गाठले आहे. ‘मला कोरोना ची लक्षणे जाणवू लागल्याने,माझी कोरोना टेस्ट करून घेतली. माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे . मी डॉक्टरांच्या सल्ल्याने आयसोलेशन मध्ये आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तात्काळ टेस्ट करावी.’ असे ट्वीट करत राम सातपुते यांनी कोरोना झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान मंत्रीमंडळातील तब्बल ७० आमदार आणि मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शालेय शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड,आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर,राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते अतुल भातखळकर यांनाही कोरोनाने गाठले आहे.

महत्वाच्या बातम्या: