🕒 1 min read
मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय क्रिकेटमधील कर्णधार टेंबा बावूमा आगामी इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो १९ जुलैपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी संघाचा भाग असणार नाही. भारत दौऱ्यात अलीकडेच दुखापत झालेल्या बावुमाला बरे होण्यासाठी आठ आठवडे लागतील असे समजले आहे. तो या दुखापतीतून बरा झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघात पुनरागमन करेल.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने त्यांच्या अनुपस्थितीत एकदिवसीय संघाची जबाबदारी फिरकी गोलंदाज केशव महाराज याच्याकडे दिली आहे. तर टी-२० संघाची जबाबदारी धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरकडे सोपवली आहे. या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडकर्त्यांनी २१ वर्षीय गेराल्ड कोएत्झीला प्रथमच टी-२० संघात मध्ये संधी दिली आहे. तर रिले रूसो २०१६ च्या टी-२० विश्वचषकानंतर संघात पुनरागमन करत आहे.
कामाचा ताण कमी करण्यासाठी वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला एकदिवसीय संघातून विश्रांती देण्यात आली आहे. हा दौरा १९ जुलैपासून सुरु होत आहे. या दौऱ्यात दक्षिण आफ्रिका व इंग्लंड संघ ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका, ३ सामान्यांची टी-२० मालिका आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
PROTEAS TOUR TO ENGLAND SQUADS ANNOUNCED ????
???? Temba Bavuma ruled out
✅ Keshav Maharaj (ODI) and David Miller (T20I) stand-in captains
???? Rilee Rossouw returns to T20I fold
???? Gerald Coetzee receives maiden T20I call-up
????♂️ Kagiso Rabada rested for ODIs#ENGvSA #BePartOfIt pic.twitter.com/AfcQ2WIXVg— Proteas Men (@ProteasMenCSA) June 29, 2022
दक्षिण आफ्रिका एकदिवसीय संघ
केशव महाराज (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को यानसेन, हेन्रिक क्लासेन, जानेमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अँडिले फेहलुक्वायो, ड्वेन प्रिटोरियस, एनरिक नारखिया, तबरेझ शम्सी, लिझाद विल्यम, वान डर ड्युसेन, खाया जोंडो, काइल वेन.
दक्षिण आफ्रिका टी-२० संघ
डेव्हिड मिलर (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, लुंगी एनगिडी, एनरिक नारखिया, वेन पारनेल, अँडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, ट्रीस्टन स्टब्स, रिले रुसो, तरबेज शम्सी, वान डर ड्यूसेन
दक्षिण आफ्रिका कसोटी संघ
डीन एल्गर (कर्णधार), सारेल एरवी, मार्को यानसेन, सायमन हार्मर, केशव महाराज, एडन मार्कराम, कगिसो रबाडा, रायन रिकेल्टन, लुंगी एनगिडी, एनरिक नारखिया, डुआन ऑलिव्हियर, कीगन पीटरसन, लुथो सिपमला, वान डर ड्यूसेन, खाया जोंडो, ग्लेंटन स्टीरमन.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
