Share

Breaking : औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ तर उस्मानाबादचे ‘धाराशीव’ नामकरण होणार! मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : खुर्चीचे संकट असताना महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. औरंगाबाद शहराला ‘संभाजीनगर’ असे नाव देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर उस्मानाबाद शहराचे नाव बदलून ‘धाराशीव’ करण्याचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिवंगत दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्यात आले आहे.

औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी नाव बदलावर आक्षेप घेतला.

राज्यपालांनी गुरुवारी ठाकरे सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जाण्यास सांगितले असताना महाराष्ट्र सरकारने हे निर्णय घेतले आहेत. मात्र, शिवसेनेने राज्यपालांच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विरोधात आल्यास उद्धव ठाकरेंना खुर्ची गमवावी लागू शकते. दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही मला अडीच वर्षे साथ दिली. धन्यवाद या अडीच वर्षात माझ्याकडून चूक झाली, माझा अपमान झाला असेल तर मला माफ करा.

शिंदे यांचा दावा

मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे जवळपास 39 आमदार त्यांच्या गटात आहेत. अपक्षांसह आपल्याकडे ५० आमदार असल्याचा शिंदे यांचा दावा आहे. आजही आम्हाला दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!