Share

Eknath Shinde : बंडखोर आमदार गुवाहाटीहून गोव्यासाठी रवाना! एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही शिवसेना…”

Published On: 

गुवाहाटी : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीतील हॉटेल सोडले आहे. विमानतळावरून ते चार्टर्ड फ्लाइटने गोव्यासाठी रवाना झाले. उद्या राज्यात विधानसभेची बहुमत चाचणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बंडखोर आमदार मुंबईच्या जवळ येत आहेत. गुवाहाटीतील बंडखोर आमदारांसाठी चार्टर्ड विमान स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आले होते. यावेळी विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

गुवाहाटी विमानतळावर बंडखोर नेते एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही उद्या मुंबईत पोहोचू आणि विश्वासदर्शक ठरावात सहभागी होऊ. त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होईल, त्यानंतर पुढील कृती ठरवली जाईल. आम्ही बंडखोर नाही. आम्ही शिवसेना आहोत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा अजेंडा आणि विचारधारा आम्ही पुढे नेत आहोत. आम्ही हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आणि राज्याच्या विकासासाठी काम करू.”

शिवसेनेच्या आमदारांचा पुढील मुक्काम गोव्यातील ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे असू शकतो. याठिकाणी 70 खोल्या बुक झाल्याची माहिती आहे. गोव्यात भाजपचे सरकार आहे आणि हे शहर मुंबईपासून जवळ आहे. म्हणजे बंडखोर आमदारांसाठी गोवा हे सोयीचे ठिकाण ठरणार आहे. मुंबईतील शिवसेना समर्थकांचा गोंधळ पाहून बंडखोर आमदारांना तिकडे जाणे सुरक्षित वाटत नसल्याने ते गोव्याला जात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!