मुंबई : राजस्थानमधील उदयपूर येथे शिवणकाम व्यवसायिकाची हत्या झाली आहे. यामुळे संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे. या हत्याप्रकरणामुळे राजस्थानमधील काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले आहेत. आरोपींनी हत्येचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रकरणावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आता यामध्ये अभिनेते शरद पोंक्षे यांनी देखील पोस्ट शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पोंक्षे यांनी इंस्टाग्रामवरून वि.दा. सावरकर यांनी लिहिलेल्या काही ओळींचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये असं म्हटलंय की, “प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्तान जगू शकेल.” शरद पोंक्षे यांनी हा फोटो शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले की, “जे उदयपूरमध्ये घडलं ते पाहिल्यावर स्वा. सावरकर आणि त्यांचे विचार पदोपदी आठवतात. हिंदूंनो जागे व्हा.”
https://www.instagram.com/p/CfXyrtyKIAN/
शरद पोंक्षे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. लोकं यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


