Share

भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये ‘या’ खेळाडूने ठोकलेले आहे सर्वात जलद शतक; वाचा!

Published On: 

मुंबई : भारताचा फलंदाज दीपक हुडा हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दमदार कामगिरी केले. या सामन्यात इशान किशन अवघ्या ३ धावा करून बाद झाला होता. यानंतर दीपक हुडा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने येताच आपले कौशल्य दाखवून दिले. आधी त्याने अवघ्या २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर ५५ चेंडूत धडाकेबाज शतक झळकावले. दीपकच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील हे पहिलेच शतक होते.

मंगळवारी २८ जून रोजी आयर्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दीपक हुडाने ५५ चेंडूत शतक झळकावले. त्याने या सामन्यात ५७ चेंडूत १०४ धावांची खेळी खेळली होती. ५५ चेंडूत शतक झळकावून भारतासाठी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याच्या बाबतीत दीपक हुड्डा आता चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत ज्या खेळाडूंची नावे समाविष्ट आहेत ते क्रिकेट जगतातील स्फोटक फलंदाज मानले जातात.

भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध अवघ्या ३७ चेंडूत हा पराक्रम केला होता. दुसरीकडे, केएल राहुल या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ४६ चेंडूत शतक झळकावले होते. त्याचबरोबर तिसऱ्या क्रमांकावरही केएल राहुल आहे. त्याने २०१८ साली इंग्लंडविरुद्ध ५३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले होते.

भारतासाठी टी-२० मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे टॉप ५ फलंदाज-

३७ चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, २०१७
४६ चेंडू – केएल राहुल विरुद्ध वेस्टइंडीज, २०१६
५३ चेंडू – केएल राहुल विरुद्ध इंग्लंड, २०१८
५५ चेंडू – दीपक हुडा विरुद्ध आयर्लंड, २०२२
५६ चेंडू – रोहित शर्मा विरुद्ध इंग्लंड , २०१८

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!