Share

SSC Scam | अर्पिता मुखर्जीकडे अर्धा किलो सोन्याच्या बांगड्या; ३१ विमा पॉलिसी तर ६० बँक खाती

Published On: 

🕒 1 min read

महाराष्ट्र देशा डेस्क : माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची सहकारी अर्पिता मुखर्जी या दोघांची चौकशी केल्यानंतर २७ जुलै रोजी ईडीने त्यांच्या मालमत्तांवर छापे मारले. यावेळी अर्पिता मुखर्जीच्या बेलघारिया येथील फ्लॅटमधून 27 कोटी 90 लाख रुपये मिळाले. या फ्लॅटमधून पाच कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. ते बिस्किटे आणि दागिन्यांच्या स्वरूपात होते. तिथे सापडलेल्या प्रत्येक बांगडीचे वजन 500 ग्रॅम पर्यंत आहे. याशिवाय तिथे काही सोन्याचे पेनही सापडले होते. तर सध्या समोर आलेल्या माहितीनुसार अर्पिताच्या नावावर 31 विमा पॉलिसी आहेत आणि त्यांच्या नॉमिनीमध्ये पार्थ चॅटर्जी यांचे नाव आहे. तसेच 60 हून अधिक बँक खाती आहेत ज्यात कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. बनावट कंपन्या बनवून हे पैसे हस्तांतरित करण्यात आले आहेत. या सर्व कंपन्या केवळ कागदावरच आहेत.

दरम्यान माजी मंत्री पार्थ चॅटर्जी 31 ऑगस्टपर्यंत तुरुंगात आहेत. गुरुवारी उच्च न्यायालयाने त्यांच्या कोठडीत १४ दिवसांची वाढ केली आहे. यावेळी पार्थ यांच्या वकिलाने सांगितले की, “पार्थ यांना अनेक गंभीर आजार आहेत. त्याचे हिमोग्लोबिन कमी झाले आहे. ते कोलकात्यातच राहतात. त्यामुळे ते कुठे फरार होण्याची शक्यता नाही, त्यामुळे त्यांना जामीन मिळावा.” मात्र न्यायालयाने सर्व युक्तिवाद ऐकूनही त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ईडीचे म्हणणे आहे की पार्थ चॅटर्जी एक प्रभावशाली व्यक्ती, आमदार आहे. ते साक्षीदार आणि पुरावे प्रभावित करू शकतात. त्याच्यात फेरफार करू शकतात. त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये. तर अर्पिताही सध्या पोलीस कोठडीत असून या घोटाळ्याबद्दल तिला काहीही माहित नसल्याचं तीच म्हणणं आहे.

70 वर्षीय पार्थ चॅटर्जी यांना 23 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. ते गेल्या 27 दिवसांपासून कोठडीत आहे. पार्थ हे ताब्यात असताना त्यांच्याशी संबंधित मालमत्तांवरून कोट्यवधी रुपये, सोने, दागिने, मालमत्ता, बँक खाती जप्त करण्यात आल्याचे ईडीने सांगितले आहे. ईडीचे वकील फिरोज एडुलजी आणि अनामिका पांडे यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पार्थ आणि अर्पिताला ३१ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली.

जप्त केलेली संपत्ती आरबीआयकडे

पार्थ आणि अर्पिता यांच्याकडून 50 कोटी रुपये रोख आणि सोने आणि दागिने आरबीआयच्या तिजोरीत जमा करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील आरोप चुकीचे सिद्ध झाल्यास ते सर्व त्यांना परत केले जाईल. जर आरोप खरे असतील तर संपूर्ण पैसा सरकारच्या तिजोरीत जाईल. तसेच दोघांना 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास देखील होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!