Share

“पवारांनी स्वतः बोलण्याऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी ‘ते’ वक्तव्य घातलं”

Published On: 

अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. ममता बॅनर्जींनी मुंबई दौऱ्या दरम्यान, काँग्रेसवर टीका केली आहे. याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील काँग्रेसवर सडकून टीका केली आहे.

राज्यातील सरकार स्थापन झाल्यापासून मी जी भूमिका मांडत आहे. त्याचे काल (शुक्रवारी) जे घडले ते उत्तम उदाहरण आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली. त्यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘युपीएचे विसर्जन झाले आहे.’मला नाही वाटत की, ते शरद पवार यांच्याशी बोलल्याशिवाय एवढे मोठे वक्तव्य करतील. कारण, महाराष्ट्रात सत्तेमध्ये राहण्याचे जे साधन राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाले आहे. त्यामुळे पवार स्वतः बोलण्या ऐवजी ममता बॅनर्जींच्या तोंडी वक्तव्य घातले आहे. एक प्रकारे या विधानामुळे काँग्रेसलाच स्वतःचे विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका ही राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे.

सत्तेमध्ये काँग्रेसचे लोक टिकून का आहेत. सत्तेचा मलिदा खाण्यासाठीही मंडळी पक्षाला चिकटून आहेत. पक्षाबद्दल, पक्षाच्या धैय्य धोरणाबद्दल, पक्ष नेतृत्त्वाबद्दल एवढ्या अवमानकारक गोष्टी घडत आहेत. खरंतर त्यांनी सत्तेला लाथमारून आपला स्वाभिमान दाखवायला पाहिजे, महाराष्ट्राला अशी अपेक्षा होती. परंतु मला आश्चर्य वाटले की काँग्रेसच्या दोन नेत्यांनी जी काल पत्रके काढली ती स्वर्गीय विलासराव देशमुखांच्या काळातील पत्रके आहेत. पत्रक सुद्धा काढताना स्वतःची अक्कल देखील गहाण ठेवली आहे. जुन्या पत्रकाचा आधार घेतात आहेत. मला वाटते काँग्रेसला एवढी नामुष्की कधी आलेली नाही. हे पाहताना अतिशय दुःख होते, असे राधाकृष्ण विखे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!