Share

Trupti Desai | “…आशीर्वाद तरी मिळतील” ; तृप्ती देसाईंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला

Published On: 

Trupti Desai | मुंबई :  सर्वांना माहित आहे की, आज नटखट, माखन चोर, मुरलीधर म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्मदिवस आहे. म्हणूनच हा दिवस श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणून ओळखला जातो. ही जन्माष्टमी देशभरात सगळीकडे साजरी केली जाते. श्रीकृष्णाचे भक्त आनंदाने, मनोभावे त्याच्या जन्माचा उत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधून देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शुभेच्छा देत, दहीहंडीत सहभागी होणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असून या गोविंदांना सरकारी नोकरीत प्राधन्य दिले जाणार असल्याची मोठी घोषणाही केली आहे. यावरून समाजसेविका तृप्ती देसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

गोविंदांना नोकरीत आरक्षण-

वर्षातून एक दिवस दहीहंडी फोडण्यासाठी आलेल्या गोविंदांना नोकरीत आरक्षण देण्यापेक्षा दररोज साहसी डोंबारी खेळ करणाऱ्या गोरगरीब मुलांना आरक्षण द्या, आशीर्वाद तरी मिळतील, असं तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून एक पोस्ट केली आहे.

दहीहंडीला खेळाचा दर्जा-

तसेच, यावर्षीपासून दहीहंडीचा अधिकृतरीत्या खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली होती. गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून राज्य सरकार गोविंदांना विमा संरक्षण देण्यात असल्याची घोषणाही नुकतीच करण्यात आली होती. त्यातच आज दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात आल्याची घोषणाही केली आहे. त्याचबरोबर दहीहंडी फोडताना पथकातील एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास त्याला १० लाख रुपये. तर गोविंदा गंभीर जखमी झाल्यास ७.५० लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच एखादा अवयव निकामी झाल्यास 5 लाख रुपये अर्थ सहाय्य केले जाणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!