🕒 1 min read
पश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी हिच्या घरातून ५० कोटींहून अधिक रोख रक्कम आणि दागिने जप्त केल्यानंतर ईडी आता अर्पिता मुखर्जीच्या चार आलिशान कारच्या शोधात आहे. तर त्याचवेळी अर्पिता मुखर्जी ईडीच्या कोठडीत ढसाढसा रडली आहे. ईडीने अर्पिताला पार्थ चॅटर्जीसोबतच्या नात्याबद्दल विचारले असता अर्पिता रडू लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. एकीकडे अर्पिताचे म्हणणे आहे कि, तिला माहित नव्हते की त्यात पैसे आहेत, कारण त्या खोल्यांना कुलूप लावलेले असायचे. तर दुसरीकडे, पार्थ चॅटर्जी यांनी ईडीला सांगितले आहे की, त्यांनी काहीही केले नाही. त्यांच्याविरुद्ध कट रचण्यात आला असून ते या कटाचा बळी ठरले आहेत.
आज पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांचे मेडिकल चेकअप होणार असून ईडीचे अधिकारी त्यांना रुग्णालयात घेऊन गेले असता अर्पिता कारमध्येच रडू लागली आणि त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. अर्पिताच्या घरावर छापा टाकल्यानंतर चार आलिशान गाड्या गायब असल्याचं सांगण्यात येत आहे. डायमंड सिटी येथील फ्लॅटमधून अर्पिता मुखर्जीच्या किमान चार गाड्या बेपत्ता आहेत. अर्पिताच्या अटकेच्या वेळी फक्त एक पांढऱ्या रंगाची मर्सिडीज कार जप्त करण्यात आली होती. हरवलेल्या कारमध्ये ऑडी ए4, होंडा सिटी, होंडा सीआरव्ही, मर्सिडीज बेंझ या कारचा समावेश आहे. तर या कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्यामुळे त्या जाणूनबुजून गायब केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जीचे कोलकात्यातील बेलघारिया भागातील क्लबटाऊन हाइट्समध्ये दोन फ्लॅट आहेत. यापैकी एका फ्लॅटवर गुरुवारी सकाळी टाकलेल्या छाप्यात ईडीने सुमारे 30 कोटी रुपये रोख आणि पाच किलो सोन्याचे दागिने जप्त केले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दुसऱ्या फ्लॅटमधून कोणतीही जप्ती करण्यात आलेली नाही. तर बेपत्ता असलेल्या कार शोधण्यासाठी तपास यंत्रणा ठिकठिकाणी छापे टाकत असून अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.
Sacked Bengal minister Partha Chatterjee claims of being framed, says "I'm a victim of conspiracy"
Read @ANI Story | https://t.co/WKWYqcqqWU#Bengalminister #ParthaChatterjee #BengalSSCScam pic.twitter.com/61WoEk1SMq
— ANI Digital (@ani_digital) July 29, 2022
तृणमूल काँग्रेसची भूमिका
दरम्यान 23 जुलै रोजी बंगाल SSC घोटाळ्याप्रकरणी पार्थ चॅटर्जी यांना ईडीने अटक केली होती. अटक करण्यापूर्वी सुमारे 24 तास ईडीने त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर काल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. या संपूर्ण प्रकरणावर तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे की ते भ्रष्टाचाराचे समर्थन करत नाहीत आणि भ्रष्टाचाराबाबत त्यांचे धोरण अतिशय कडक आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Uddhav Thackeray । ते शिवसैनिक नाहीत, तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
- Nana Patole : राज्यातील ED सरकार झोपी गेलेलं बहिर सरकार आहे – नाना पटोले
- Ajit Pawar | मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी फिल्डवर उतरून पाहणी करावी; अजित पवारांचा सल्ला
- Tanushree dutta and Nana Patekar | “मला काही झाले तर नाना पाटेकर,…”; तनुश्री दत्ताची खळबळजनक पोस्ट
- Ajit Pawar | “मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी…” ; अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांना सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
