Share

Arpita Mukharjee | अर्पिता मुखर्जीच्या दुसऱ्या घरावर छापा; 29 कोटींची रोकड आणि सोनं जप्त

Published On: 

🕒 1 min read

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी आणि अभिनेत्री अर्पिता मुखर्जी हिच्या घरांवर ईडीकडून छापेमारी सुरूच आहे. बुधवारी ईडीने कोलकात्याच्या आसपासच्या तीन ठिकाणी छापे मारले होते. यादरम्यान ईडीने अर्पिता मुखर्जीच्या बेलघारियातील आणखी एका फ्लॅटवर छापा मारला आहे. ईडीच्या या छाप्यात सुमारे 29 कोटी रुपये रोख आणि सुमारे 5 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. रोख रक्कम इतकी होती की ती मोजण्यासाठी ईडीला 10 तास लागले. सर्व पैसे अर्पिताने टॉयलेटमध्ये लपवले होते.

पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी ही कारवाई करत आहे. याप्रकरणी पार्थ चॅटर्जी यांनाही अटक करण्यात आली आहे. यापूर्वी, ईडीने अर्पिता मुखर्जीच्या फ्लॅटमधून सुमारे 21 कोटी आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या होत्या. त्यानंतर 23 जुलै रोजी ईडीने अर्पिताला अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा सापडलेल्या या वस्तू आणि पैश्यांमुळे पार्थ चॅटर्जी यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. दरम्यान पार्थ चॅटर्जी यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या छापेमारी संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला सोसायटीतील दोन फ्लॅटपैकी एका फ्लॅटमध्ये मोठी रोकड सापडली आहे. आम्ही पैसे मोजण्यासाठी तीन मशीन मागवल्या होत्या, जेणेकरून नक्की किती रक्कम आहे हे कळू शकेल. या रकमेबरोबरच फ्लॅटच्या झाडाझडतीदरम्यान अनेक “गंभीर आणि महत्वाची” कागदपत्रे सापडली आहेत”. तसेच अर्पिता मुखर्जी तपासात सहकार्य करत आहेत, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!