🕒 1 min read
मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे तरुणाईचं सरकार असून आजचा जन्माष्ठमीचा दिवस तुम्हाला समर्पित असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. वरळीतील जांबोरी मैदानात भाजपच्या दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रकरणी फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर उपस्थित होते.
आता आपले सरकार आहे. आपले सकार आल्यानंतरर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातो. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, की आता गोविंदा हे खेळाडू असतील. दहीहंडी आता साहसी खेळ आहे. खेळाडूच्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील. कोणी जखमी झालं तर सरकार तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय, तसेच आता आपण भ्रष्टाचाराची हंडी फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आपण करू, असेही फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | सर्व विद्यार्थ्यांना BEST बसचा पास द्या ; एकनाथ शिंदे यांची सुचना
- Rajan Salvi | मरेपर्यंत शिवसेनेतच राहणार, बंडखोरीच्या चर्चांवर राजन साळवींच स्पष्टीकरण
- देव तारी त्याला कोण मारी! सकाळी केली इमारत रिकामी अन् दुपारी कोसळली, पाहा व्हिडीओ
- रायगडच्या किनाऱ्यावर कडेकोट बंदोबस्त, जाणून घ्या शस्त्रांनी भरलेली बोट महाराष्ट्रात कशी आली?
- Ram Kadam | देशात सर्वांसाठी कायदा समान आहे – राम कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
